मधुमक्षिका पालनाचे मोफत प्रशिक्षण
शाश्वत पर्यावरण विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार
महाड, ता. १९ (बातमीदार) : महाड तालुक्यात शाश्वत पर्यावरण विकासाच्या दृष्टीने पद्मविभूषण डॉ. सी. डी. देशमुख शाश्वत ग्राम विकास केंद्र, ग्राम पंचायत नाते आणि खादी व ग्रामोद्योग महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालनाचे १० दिवसीय मोफत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
चवदार तळे सत्याग्रह शतकमहोत्सवी वर्ष तसेच जागतिक वन आणि जल दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने ‘गांधारी मधाचे गाव’ या योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण २० ते २९ मार्च या कालावधीत पद्मविभूषण डॉ. सी. डी. देशमुख सभागृह, नाते येथे पार पडणार आहे. या प्रशिक्षणात मधुमक्षिका पालनाचे मूलभूत तत्त्वज्ञान, मधमाशांचे प्रकार, त्यांचे संगोपन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मध उत्पादन वाढविण्याच्या पद्धती, रोग व्यवस्थापन तसेच मध व इतर उपउत्पादनांचे विपणन याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय मधुमक्षिका पालनाचा शेती उत्पादनावर होणारा सकारात्मक परिणाम, परागीभवनामुळे पिकांची उत्पादकता वाढ, तसेच शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचे साधन म्हणून या व्यवसायाचे महत्त्व याबाबतही प्रशिक्षणार्थींना माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार असून, युवक व शेतकरी यांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून मध उत्पादन वाढवून स्थानिक ब्रँड निर्माण करणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि गाव पातळीवर आर्थिक सक्षमीकरण साधणे, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.