ग्रीनपार्क सदनिकाधारकांचा उपोषणाचा इशारा
प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष; २ मेपासून बेमुदत आंदोलन
महाड, ता. २३ (बातमीदार) : नवेनगर येथील ग्रीनपार्क गृहप्रकल्पातील श्री गणेश-१ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (ता. २ मे) बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोसायटीचे सचिव संतोष गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या २० ऑगस्ट २००८ च्या निर्णयानुसार चटई क्षेत्रावर आधारित सदनिकाविक्रीची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बांधकाम परवानगीतील अटींचे उल्लंघन करून विक्री केल्याप्रकरणी संबंधित बिल्डरांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, भोगवटा प्रमाणपत्रात प्रत्यक्ष क्षेत्राचा समावेश करणे, अग्निशमन ना हरकत दाखल्याविना दिलेल्या भोगवट्याची चौकशी, तसेच बंधपत्राचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. उपोषण श्री गणेश मंदिर प्रांगणात शांततेत होणार असून, प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली आहे.
चौकट
चटई क्षेत्र नियमाची अंमलबजावणी व कायदेशीर कारवाईची मागणी
सभासदांचा मुख्य आक्षेप चटई क्षेत्राच्या निकषांनुसार सदनिकांची विक्री न होण्यावर आहे. यामुळे आर्थिक व कायदेशीर नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बांधकाम नियमांचे उल्लंघन करून दिलेल्या परवानग्यांमुळे भविष्यातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दोषींवर तातडीने कारवाई करून भोगवटा व कागदपत्रे नियमबद्ध करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी ठामपणे मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.