मुंबई

शिक्षक अभियोग्यता, बुद्धीमत्ता चाचणी

CD

शिक्षक अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी
अर्ज करण्यासाठी आठ फेब्रुवारीपर्यंत मुदत
मुंबई, ता. ३१ : संगणक प्रणालीवरून होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठीचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.
परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि कालावधी याबाबतची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्‍थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रमाणपत्राच्या मूळ प्रती जोडण्याची आवश्यकता नसून मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे,
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी http://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या वेबलिंक वरून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे; तर १५ फेब्रुवारीपासून उमेदवारांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officer Transfer : मोठी बातमी! पोलिस दलातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुण्यातील दोन पोलिस उपायुक्तांच्या बदल्या

Latest Marathi News Live Update: नागपुरात 'मेड इन पाकिस्तान' असलेल्या कॉसमॅंटिक जप्त

MI vs GT Live : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दोन युवा खेळाडूंचे पदार्पण! एक नागपूरचा पठ्ठ्या, तर दुसरा पंजाबचा...; जाणून घ्या Playing XI

Uruli Kanchan Crime : शिवीगाळ का केली? विचारले म्हणून तरुणावर आणि भावावर चाकू हल्ला; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Ambegaon Coordination Meet: घोडेगाव तालुका समन्वय बैठकीत दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT