मुंबई

मालाडमध्ये ४० लाखांची वीजचोरी उघड

CD

मुंबई, ता. १० : अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाने नुकतेच मालवणी-राठोडी गाव (मालाड प.) येथे एका व्यावसायिक जागेतून ४० लाखांची वीज चोरी उघडकीस आणली. याप्रकरणी या व्यवसायाचे मालक व भाडेकरू यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मेसर्स ब्राईट मेटल कोटिंग वर्क्सच्या व्यावसायिक जागेतील विजेच्या मीटरमधून रितसर वीजपुरवठा न घेता थेट वीजपुरवठा घेतला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे दक्षता पथकाने मेटल कोटिंग वर्क्सचे मालक विमलेश बैजनाथ शर्मा, तसेच भाडेकरू जोगिंदर सिंह आणि अब्दुल अहमद सय्यद यांच्याविरुद्ध कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपासासाठी हे प्रकरण मालवणी पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाला मालवणी येथे वरील व्यवसायाच्या जागेतील वीज मीटरमध्ये हेराफेरी होत असल्याचे आढळून आले. येथे प्रत्यक्ष वापरली जाणारी वीज आणि मीटरवर नोंद होणारी वीज यांच्यातही मोठी तफावत आढळली. त्यामुळे वीजचोरी होत असल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली. ही चोरी संध्याकाळी साडेपाच ते सकाळी आठ या वेळेत होत होती.


कंपनीचे प्रवेशद्वार आतून कुलूपबंद असल्याने पोलिसांच्या साह्याने आतमध्ये शिरून प्रत्यक्ष तपासणी केल्यावर वीजचोरी उघड झाली. दोन लाख १७ हजार ७१७ युनिटची म्हणजेच ४० लाख १८ हजार रुपये मूल्याच्या विजेची चोरी झाल्याचे आढळले. वीजमीटरच्या डेटा विश्लेषणाद्वारे ही चोरी उघड झाल्याने अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले. दक्षता पथकाने एप्रिल ते डिसेंबरदरम्यान ११,९८९ छापे टाकून वीजचोरीप्रकरणी ५७१ तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे या घटना कमी झाल्या. वीजचोरी हा अजामीनपात्र गुन्हा असून गुन्हेगारास दंड, तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असेही प्रवक्त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT