मुंबई

बलात्कार प्रकरणातील आरोपी दोषमुक्त

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. २०१६-१७ मध्ये त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावेळी तक्रारदार अल्पवयीन असल्याचे सांगितल्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, तक्रारदार मुलीचे वकील कोणताही पुरावा न्यायालयात दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे तिन्ही आरोपींना दोषमुक्त करण्यात आले आहे.

तिन्ही आरोपींनी माझ्यावर बलात्कार केला असून त्याची चित्रफीत बनवली आहे. तसेच, ही चित्रफीत इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत आहेत, अशी तक्रार तक्रारदार मुलीने केली होती. या आरोपींमध्ये तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराचाही समावेश होता. त्यावेळी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, पोलिस न्यायालयात संबंधित चित्रफीत दाखल करू शकले नाहीत. तसे, तक्रारदार मुलगी तेव्हा अल्पवयीन नव्हती. तिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळल्यामुळे तिने बलात्काराचा आरोप केला आहे, असा युक्तीवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. विशेष म्हणजे तक्रार दाखल केली तेव्हा मुलगी गर्भवती होती. तेव्हा तिची डीएनए चाचणी करण्यात आली. पण, डीएनए तिन्ही आरोपींपैकी कुणाशीही जुळला नाही, असा वैद्यकीय अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आरोपींना दोषमुक्त करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT