मुंबई

मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प २० मार्चला

CD

मुंबई, ता. २ : मुंबई विद्यापीठाचा २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा अर्थसंकल्प २० मार्चला सादर केला जाणार आहे; मात्र मागील आठ महिन्यानंतरही विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळू शकला नसल्याने प्रभारी कुलगुरू आणि प्रभारी कुलसचिव यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यावर माजी सिनेट सदस्यांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.

१६ मार्च २०२२ रोजी मुंबई विद्यापीठाने आपला २०२२-२३ या वर्षाचा ८०९ कोटी आणि तब्बल ७३ कोटी ८८ लाखांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर काही महिन्यांतच तत्कालीन कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ ३० ऑगस्टला संपला. त्यानंतर तीन महिन्यांत विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणे अपेक्षित होते; मात्र उच्च शिक्षण आणि राजभवनाकडून झालेल्या दिरंगाईमुळे मागील आठ महिन्यांपासून विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरू आणि प्रभारी कुलसचिव यांच्या माध्यमातून सुरू आहे.

प्रभारी कुलसचिव म्हणून कारभार पाहणारे सुनील भिरूड हे भेटणे आणि बोलणेही टाळत असल्याचा आरोप करून सिनेट सदस्य, विद्यार्थी आणि इतर संघटनांनी त्यांच्याविरोधात अनेकदा संताप व्यक्त केला आहे. अशाच परिस्थितीत येत्या २० मार्चला मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने माजी सिनेट सदस्यांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे.

जून महिना उजाडणार
१) विद्यापीठ कायद्यात बदल केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी समितीही गठित झाली असली तरी अद्यापही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकली नाही. त्यामुळे कुलगुरू पूर्णवेळ मिळण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर सिनेट अस्तित्वात येईल.
२) पेडणेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यपालांनी प्रभारी प्र-कुलगुरू पदाचा तात्पुरता कार्यभार डॉ. अजय भामरे यांच्याकडे १९ सप्टेंबर रोजी सोपवला आहे. डॉ. भामरे हे एकटेच आणि जोमाने कामाचा सर्व व्याप सांभाळत आहेत. त्यांना प्रभारीपदी आलेल्या इतर अधिकाऱ्यांचे नीट सहकार्य मिळत नसल्याने अनेक विषयांच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याचे विद्यापीठातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रभारी कुलगुरू आणि प्रभारी कुलसचिव या दोघांकडे आपल्या मूळ संस्थांचीही जबाबदारी आहे. त्यांचे पूर्णवेळ मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाकडे लक्ष नसल्याने एकूण कारभार रामभरोसे सुरू आहे. सिनेट निवडणुका पार पडल्यानंतर आम्ही विद्यापीठातील प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेऊ.
- प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य

विद्यापीठातील प्रशासकीय कामजावार बाबू लोकांचाच वरचष्मा राहणार असल्याने विद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या हिताकडे किती लक्ष देण्यात आले, त्यासाठी कोणती अधिकची तरतूद करण्यात आली, यावर जाब कोण विचारणार?
- ॲड. संतोष धोत्रे, युवासेना सह सचिव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

IPL 2024 Play Off Equation : काय सांगता... मुंबई अन् आरसीबी अजूनही गाठू शकतात प्ले ऑफ; फक्त देव ठेवावे लागणार पाण्यात

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

SCROLL FOR NEXT