मुंबई

आरटीओतील बदल्यांसाठी निवृत्त अधिकारी सक्रीय

CD

मुंबई, ता. ११ : परिवहन विभागात अधिकाऱ्यांच्या बढती तसेच बदली प्रक्रियेत कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. तीन वर्षांपासून रखडलेल्या आरटीओ विभागातील बढती, बदलीच्या प्रक्रियेत निवृत्त परिवहन अधिकारी सक्रिय झाले आहेत. लक्ष्मण खाडे असे या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या नावाचा वेळोवेळी उल्लेख असलेल्या दोन मोटार वाहन निरीक्षकांच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच खाडे यांनी पाठवलेल्या बदलीसाठी पात्र नावांच्या यादीचा स्क्रीनशॉट ‘सकाळ’च्या हाती लागला आहे.
आरटीओ विभागातील बढती, बदल्यांचा विषय नेहमीच वादाचा ठरला आहे. त्यातच मागील तीन वर्षांपासून बढत्या-बदल्या प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. परिवहन खात्यात मलाईदार ठिकाणी बढती, बदली मिळवण्यासाठी कायम चढाओढ असते. बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्याची चर्चा असताना आर्थिक व्यवहारातून इच्छुक ठिकाणी बढती, बदली करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी लक्ष्मण खाडे लॉबिंग करत असल्याच्या आरोप केला जात आहे. नागपुरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून बुधवारी त्यांनी आरटीओत कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बदलीस पात्र मोटार वाहन निरीक्षकांना फोन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन परिवहन निरीक्षकांच्या संवादाची ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. त्यात खाडे यांच्या नावाचा वारंवार उल्लेख आला आहे. त्यापाठोपाठ आता खाडे यांनी पाठवलेल्या बदल्यांसाठी पात्र यादीचे स्क्रीन शॉट ‘सकाळ’च्या हाती लागले आहे. त्यामुळे परिवहन विभागाची बदली प्रक्रिया पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे.
-------------
कल्याणच्या अधिकाऱ्याचाही समावेश
खाडे यांच्या रॅकेटमध्ये कल्याण परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राहुल पवार सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कल्याण आरटीओ कार्यालयात बुधवारी पवार यांच्या रजेचा अर्ज आलेला नसतानाही ते खाडे यांच्यासोबत नागपुरात कसे उपस्थित होते, असाही प्रश्नही विचारला जात आहे.
---
१८ अधिकाऱ्यांची नावे यादीत
खाडे यांनी पाठवलेल्या यादीतील स्क्रीन शॉटमध्ये नागपूर शहरातील ८, गोंदियातील चार, तसेच नागपूर ग्रामीण आणि भंडाऱ्यातील प्रत्येकी तीन मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. तसेच अन्य आरटीओ कार्यालयातील पात्र मोटार वाहन निरीक्षकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना इच्छुक ठिकाणी बढती, बदली मिळवण्यासाठी फोन करण्यात आले असल्याची शक्यता आहे.
--
नागपूरला बुधवारी मी खासगी कामासाठी गेलो होतो. संध्याकाळीच परत निघालो. परिवहन विभागाशी सध्या माझा काही संबंध नाही. चुकीची माहिती पसरवली जात आहे.
- लक्ष्मण खाडे, निवृत्त, परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT