मुंबई

निर्देशांकांमध्ये अल्प घसरण

CD

मुंबई, ता. २८ : कोणत्याही देशांतर्गत व जागतिक ठोस संकेतांअभावी आज भारतीय शेअर बाजारांना फारशी चमक दाखवता आली नाही. आज सेन्सेक्स ४०.१४ अंश; तर निफ्टी ३४ अंशांनी घसरला.

दिवसाअखेर सेन्सेक्स ५७,६१३.७२ अंशांवर; तर निफ्टी १६,९५१.७० अंशांवर स्थिरावला. आज निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३२ शेअरचे भाव कमी झाले; तर सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी १९ शेअरचे भाव कमी झाले. आज केवळ बँकांच्या शेअरचे भाव वाढले होते, बाकी जवळपास सर्व क्षेत्रे तोट्यात होती. त्यातही ऊर्जानिर्मिती, ऑईल ॲण्ड गॅस या क्षेत्रांमध्ये मोठी नफावसुली झाली.

सेन्सेक्समधील टेक महिंद्र, टाटा मोटर, एअरटेल या शेअरचे भाव दोन ते तीन टक्के घसरले; तर विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो, महिंद्र आणि महिंद्र, मारुती, इन्फोसिस या शेअरचे भाव एक ते दीड टक्का घसरले. इंडसइंड बँक सव्वादोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढला, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी या शेअरचे भाव अर्धा ते एक टक्का वाढले.

कोट
.............
रिझर्व्ह बँक व्याजदरवाढीच्या अपेक्षेत गुंतवणूकदार अजूनही साशंक आहेत.
- विनोद नायर, जिओजित फायनान्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT