मुंबई

मालाडमधील वाहतूक कोंडी फुटणार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पश्चिम उपनगरांमध्ये कायम वर्दळीच्या असणाऱ्या स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड) वरील मालाड, पश्चिम येथील वाहतुकीची कोंडी आता दूर होणार आहे. या मार्गावरील रामचंद्र लेन नाल्यानजीक दारुवाला कंपाऊंड येथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी १६ दुकाने हटवण्याची कारवाई पी उत्तर विभागाने बुधवारी (ता. २९) केल्याने पर्यायाने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड) वर रामचंद्र लेन नाल्यानजीक दारूवाला कंपाऊंड येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. नाल्यानजीक असणारी १६ व्यावसायिक दुकानांची बांधकामे तेथे अडथळा ठरत होती. त्यामुळेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पी उत्तर विभागाकडून ही १६ दुकानांची बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरण प्रस्तावित होते. या १६ व्यावसायिकांना जागेसाठीचा आर्थिक मोबदला महापालिकेकडून देऊन ही बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी उत्तर विभाग कार्यालयाने ८ अभियंते, १५ कामगार आणि १ जेसीबी संयंत्र यांच्या साह्याने ही १६ बांधकामे हटवण्याची कारवाई पूर्ण केली.

संबंधित दुकान मालकांना लवकरच आर्थिक मोबदला प्रदान करण्यात येईल. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही करण्यात येत आहे.
- किरण दिघावकर, सहायक आयुक्त

न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर उर्वरित कारवाई
महापालिकेने स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड) येथे ९० फूट रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. व्यावसायिक दुकानदारांचा अडथळा हटवण्यात आल्याने रस्ते रुंदीकरणाचे काम वेगाने होण्यासाठी मदत होणार आहे. या ठिकाणी आणखी काही बांधकामे हटवण्याची प्रक्रिया ही न्यायालयीन आदेशाच्या प्रतीक्षेत असून त्यासाठीची उचित कारवाईदेखील आगामी काळात होईल, असे प्रशासनाकडून नमूद करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT