मुंबई

अंधेरी येथे भरणार रुग्ण दरबार : गरजू रुग्णांना मिळणार मदत;

CD

अंधेरीत रुग्ण दरबार
गरजूंना मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक खचून जातात. अशा तळागाळातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांच्या वतीने रुग्ण दरबार भरवला जाणार आहे. ‘एक खिडकी मदत’ उपक्रम या रुग्ण दरबारच्या माध्यमातून होणार आहे.
रुग्णांना वेळेत मदत न मिळाल्याने त्यांना मानसिक त्रास व अनेक अडचणींना सामोरे जाव लागते. महापालिका रुग्णालयात गर्दी वाढत असून शस्त्रक्रिया खूप लांबणीवर जातात. खासगी रुग्णालयात तर अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने रुग्णांची लूट होते. अशा भीतीच्या वातावरणात रुग्ण व त्यांचे नातेवाईकांची दिशाभूल होते. अशा अनेक प्रश्नांवर मात करण्याचा प्रयत्न रुग्ण दरबारच्या माध्यमातून केला जाणार आहे. आरोग्य विषय मदत आणि आरोग्य विषयक मुद्द्यांवर या उपक्रमाच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.

रुग्ण दरबारात मोफत योग्य ते सहकार्य आणि मार्गदर्शन मिळणार असहे. तसेच सवलतीच्या दरात उपचार आणि शस्त्रक्रिया करून दिल्या जातील.
– भीमेश मुतुला, आयोजक, रुग्ण दरबार

येथे करा संपर्क
९१९००४३५२५४५ प्रशांत पात्रे, ९१९१६७४५७८९२ शंकर कुशवाह, ८९२८० ३१९३१ प्रियंका मुगेंकर

या आजारांवर मिळेल मदत
ॲन्जियोप्लास्टी, बायपास, ॲन्जियोग्राफी, वाल्स रिप्लेसमेंट, पेस मेकर इम्प्लांट, मोतीबिंदू, किडनीस्टोन, किडनी ट्रांसप्लांट, कॅन्सर, केमो थेरोपी, जनरल सर्जरी, गायनेकोलॉजिकल, ब्रेन सर्जरी, क्‍नी रिप्लेसमेंट, हीप रिप्लेसमेंट, स्पाईन सर्जरी, कॅटरेक्ट सर्जरी अशा अनेक आजारांवर मदत करण्यात येणार आहे; तरी मुंबईतील गरजू व दारिद्र्य रेषेखालील सामान्य जनतेला आपल्या हॉस्पिटल फाईल व संबंधित कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन भीमेश मुतुला यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT