मुंबई

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाची प्रकृती स्थिर

CD

मुंबई, ता. १ : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुलगा अनुज पटेल यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले. अनुज यांना ३० एप्रिलला दुपारी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होते.
प्रकृती स्थिर झाल्यानंतर हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालय प्रवक्त्याने सांगितले, की केडी रुग्णालयातील न्यूरोसर्जन्सनी योग्य आपात्कालीन प्रक्रिया केली होती, ज्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर झाली. आता त्यांना सोमवारी सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने पीडी हिंदुजा रुग्णालयात ऑपरेशन प्रक्रियेसाठी हलवण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. न्यूरोसर्जन डॉ. बी. के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या कुशल पथकाने ही शस्त्रक्रिया केली. ते बरे होईपर्यंत पी. डी. हिंदुजा रुग्णालयात आयसीयूमध्ये राहणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: शरद पवार 'जंतरमंतर'वर! अभिजित दीपकेंची घेतली भेट; आंदोलक आक्रमक, म्हणाले...

सोनम, सर उपोषण थांबवा! तुम्ही आणि विद्यार्थी देशाच्या भविष्यासाठी लढताय... माझा तुम्हाला फुल सपोर्ट; IPL संघ मालकिणीची पोस्ट व्हायरल

Live Updates Marathi : वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

Mumbai: पाच वर्षांत ६,५०० मेगावॉट विजेची गरज, मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, डेटा सेंटरचा थेट परिणाम

धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानाजवळ आंदोलन | CJP Andolan

SCROLL FOR NEXT