मुंबई

चौक बनणार ‘मास्टिक अस्फाल्ट’मध्ये

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम उपनगरे विभागातील परिमंडळ तीन येथील विविध रस्त्यांच्या चौकांची सुधारणा करण्यासाठी ‘मास्टिक अस्फाल्ट’चा वापर करण्यात येणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात एच पश्चिम आणि के पूर्व विभागातील काम पूर्ण केले जाणार असून त्‍यासाठी पालिकेचा रस्ता विभाग साधारणतः ३४ कोटी रुपये खर्च करणार आहे.
पश्चिम उपनगरातील एच पश्चिम आणि के पूर्व येथील डांबरी व पेव्हर ब्लॉक बसवलेल्‍या रस्‍त्‍यांची विविध कारणांमुळे झीज झाली आहे. काही रस्त्यांना भेगा पडल्या असून परिणामी वाहतूक कोंडी होते. या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. तसेच अनेकदा चर, खड्डे खणणे यासारख्या कामांमुळे पाणी साचून राहते. शिवाय जलवाहिन्यांद्वारे होणारी गळती यामुळे रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पुढील दोन वर्षांमध्ये मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याबाबतचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने पश्चिम उपनगरे विभागातील प्रथम टप्प्यामध्ये एकूण २५६ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. त्याप्रमाणे उर्वरित रस्ते काँक्रीटीकरण करण्यासंबंधी दुसऱ्या टप्प्यामध्ये मार्च २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे; परंतु सदर कामाबरोबरच सदर रस्त्यावरील विविध चौकांमधील रस्त्यांचे बळकटीकरण करून सुधारणा करणे आवश्यक असल्याने सदरची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

३० चौकांची सुधारणा
पश्चिम उपनगरे विभागांतर्गत एच पश्चिम आणि के पूर्व विभागातील प्रत्‍येकी १५ अशा एकूण ३० चौकांचे मास्टिक अस्फाल्टमध्ये सुधारणा करण्यात येणार. यासाठी अंदाजित खर्च ३६ कोटी ८५ लाख इतका आहे.

यांना मिळाले काम
महापालिकेने टक्केवारी तत्वावर ई-निविदा मागविल्या होत्या. त्याला ७ निविदाकारांनी ई-निविदेद्वारे प्रतिसाद दिला. मेसर्स कमला कंस्ट्रक्शन यांनी नमुद केलेले दर हे लघुत्तम असल्‍याने त्यांना कंत्राट देण्याची शिफारस केली आहे. या कामाचा कंत्राट कालावधी पावसाळा वगळून बारा महिने आहे असून यासाठी ३३ कोटी ९१ लाख खर्च केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT