मुंबई

आरटीई प्रवेशासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ

CD

मुंबई, ता. ८ : खासगी शाळांतील आरटीई प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यादरम्यान पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे. आरटीईच्या तब्बल ५१ हजार ८८० जागा अद्याप रिक्त आहेत.

आरटीई प्रवेशाची लॉटरी ५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात प्रवेशाची प्रक्रिया १३ एप्रिलपासून सुरू झाली; मात्र आरटीईचे संकेतस्थळ योग्य प्रकारे चालत नसल्याने असंख्य पालकांना प्रवेश घेण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संचालकांनी प्रवेशासाठी सोमवार (ता. ८) पर्यंत मुदत दिली होती; मात्र त्यानंतरही हजारो जागांवरील प्रवेश होऊ न शकल्याने पुन्हा १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळांनी आपल्याकडील सर्व प्रवेश प्रक्रिया, प्रलंबित राहिलेल्या प्रवेशाबाबतच्या तक्रारी आणि अपील अर्जांची सुनावणी घेऊन त्यासाठीची सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आदेशही संचालकांनी शाळांना दिले आहेत.

पालकांना आवाहन
राज्यातील आठ हजार ८२३ शाळांमध्ये एक लाख एक हजार ८४६ आरटीई प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४९ हजार ९६६ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित तब्बल अर्ध्याहून अधिक म्हणजेच ५१ हजार ८८० जागांवर प्रवेश होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पालकांनी देण्यात आलेल्या मुदतीत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT