मुंबई

आयसीएसईच्या दहावी-बारावीत मुंबईच्या विद्यार्थ्यांचा दबदबा

CD

मुंबई, ता. १४ : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (आयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) एकूण ९८.९४ टक्के; तर बारावीच्या (आयएससी) परीक्षेत ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या नऊ विद्यार्थ्यांनी ९९.८० टक्के गुण मिळवले असून त्यामध्ये मुंबई, ठाण्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने या परीक्षेवर यंदाही मुंबईचा दबदबा दिसला.
यंदाही या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. दोन्हीही परीक्षांच्या निकालात यंदा वाढ झाली आहे. दहावीच्या २ हजार ६१६ शाळांतील २ लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ९८.९४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या १ हजार २९१ शाळांतील ९८ हजार ५०५ विद्यार्थ्यांपैकी ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत बॉम्बे स्कॉचिस स्कूलची श्रेया उपाध्याय, कॅम्पियन स्कूलचा अद्वेय सरदेसाई, ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानियातील यश भासैन, मुंबईतील कपोल स्कूलमधील तनय शहा, मालाडमधील चिल्ड्रेन ॲकॅडमीतील हिया संघवी यांनी ९९.८ टक्के गुण मिळवून देशाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
दहावीच्या परीक्षेत राज्यातील २१ जणांनी ९९.६०; तर ४४ जणांनी ९९.४० टक्के गुण मिळवले आहेत. राज्यातील दहावीच्या २५३ शाळांतून २७ हजार १०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून ९९.८३ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या ६३ शाळांमधून ४ हजार ११३ जण परीक्षेला बसले होते, त्यातील ९८.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
...
राज्यातील दहावीतील टॉपर
नाव - शहर - टक्के
श्रेया उपाध्याय मुंबई ९९.८
अद्वेय सरदेसाई मुंबई ९९.८
यश भासैन ठाणे ९९.८
तनय शाह मुंबई ९९.८
हिया संघवी मुंबई ९९.८
...
राज्यातील बारावीतील टॉपर
नाव- शहर- टक्के
तनिशा जोशी-पुणे-९९.७५
कीर्ती मखिजा-ठाणे-९९.२५
अन्विता भारपिलानिया-मुंबई-९९.२५
कृष्णा मनकर्मी-मुंबई-९९.००
मयांक अग्रवाल-ठाणे-९९.००
बेरा प्रद्योत-नवी मुंबई-९९.००
अनन्या शिधोरे-ठाणे-९९.००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT