मुंबई

संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांना चेंबूर वसतिगृहात प्रवेश

CD

मुंबई, ता. १७ : २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात पदवी, विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या मागासवर्गीय आणि इतर घटकांतील २५० विद्यार्थ्यांना चेंबूर येथील संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहात प्रवेश दिले जाणार आहेत.
वसतिगृहाची इमारत दुरुस्ती आणि बांधकाम सुरू असल्याने २५० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नव्हते; मात्र आता मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाला इमारत मिळाल्याने हे प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थांना २० मेपर्यंत संत एकनाथ मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परिसर, आर सी मार्ग, चेंबूर येथे प्रवेश अर्जांचे वाटप व स्वीकृती केली जाणार आहे. प्राप्त अर्जांवरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. त्यामुळे या वसतिगृह प्रवेशासाठी विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहायक आयुक्त, प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

प्रस्‍तावित वसतिगृह
मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये ७५० क्षमतेचे मुलांचे वसतिगृह प्रस्तावित आहे. यापैकी २५० मुलांची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष २०२२-२३ या वर्षांमध्ये सुरू करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी निवासस्थान तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे.

अर्जासाठीची पात्रता
वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. सदर विद्यार्थ्याकडे पालकांच्या उत्पन्नाचा दाखला असावा. विद्यार्थी सन २०२२-२०२३ मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावा, स्थानिक रहिवासी नसावा, विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT