मुंबई

पंतप्रधानपदाच्या नऊ वर्षांनिमित्त भाजपची ‘मोदी @ ९’ मोहीम

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : लोकसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष राहिले असताना भाजपने जनतेपर्यंत केंद्राची विकासकामे पोहोचवण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाची नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘मोदी @ ९’ नावाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या महासंपर्क मोहिमेचे संयोजक आमदार प्रवीण दरेकर यांनी नुकतीच पत्रकारांना त्याबाबत माहिती दिली.

मोहिमेच्या निमित्ताने भाजपने निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजवला असल्याचे बोलले जात आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ३० मे ते ३० जूनपर्यंत भाजपतर्फे तीन वेगवेगळ्या मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. ही मोहीम देशभर राबवली जाणार असून या निमित्ताने राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघांत विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातील. त्यात केंद्रीय मंत्री, देशातील वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री आदी मान्यवरांतर्फे ४८ लोकसभा मतदारसंघांत ४८ जाहीर सभा घेतल्या जातील. पत्रकार परिषदाही होतील. क्रिकेटपटू, साधू-संत, समाजसेवक, गायक आणि कलाकारांशीही संपर्क केला जाईल. समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तींची संमेलने घेऊन त्यांच्याशीही वार्तालाप होईल. विधानसभा क्षेत्रानुसार व्यापारी संमेलन, लाभार्थी संमेलन, पक्षाचे वेगवेगळे मोर्चे-आघाड्या यांची संमेलने, कार्यकर्ता संमेलनेही होणार आहेत.

‘विकासार्थ तीर्थ’ या मोहिमेत केंद्रातर्फे, तसेच खासदारांच्या पुढाकाराने झालेल्या विकासकामांची जनतेसोबत पाहणी दौरा करून माहिती दिली जाईल. ३० व ३१ मे रोजी या मोहिमेची सुरुवात होणार असून त्यावेळी पंतप्रधानांची आरंभसभाही होईल. २३ जून रोजी जनसंघाचे संस्थापक-अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने नरेंद्र मोदी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असे दरेकर म्हणाले.

लोककल्याणाची कामे घरोघरी!
घरघर संपर्क मोहिमेंतर्गत, गेल्या नऊ वर्षांत केंद्राने केलेली लोककल्याणाची कामे घरोघरी पत्रके आणि पुस्तिकेच्या माध्यमातून पोहोचवली जातील, असे प्रवीण दरेकर म्हणाले. २१ जून म्हणजे जागतिक योग दिनीही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात योगाभ्यासाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT