मुंबई

मुंबईत गुलाबी हवा

CD

मुंबईत गुलाबी हवा
उत्तम गुणवत्तेची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः मुंबईतील वाढलेल्या उष्णतेमुळे लोक त्रस्‍त झाले असले, तरी हवा मात्र शुद्ध झाली आहे. सफर संस्थेने दिलेल्या माहतीनुसार मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘उत्तम’ नोंदवण्यात आला आहे. कोणताही परिसर ‘रेड झोन’मध्ये नाही, हे विशेष.
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा ४९ सह उत्तम नोंदवण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचदा रेड झोनमध्ये असणाऱ्या बीकेसी, वरळी आणि अंधेरीमध्ये स्वच्छ हवेची नोंद झाली आहे. बीकेसी ३२, वरळी ३९ आणि अंधेरी ४२ असा येथील हवा गुणवत्ता निर्देशांकासह उत्तम हवेची नोंद झाली आहे.
मुंबईतील इतर परिसरातील हवेची गुणवत्ता ही समाधानकारक नोंदवण्यात आली आहे. कुलाबा ५५, मालाड ५१, बोरिवली ५४, माझगाव ७१ आणि चेंबूर ७६ निर्देशांकासह ‘समाधानकारक’ हवा गुणवत्तेची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत कुठेही ‘वाईट’ किंवा ‘अतिशय वाईट’ हवेची नोंद झाली नाही. मुंबईतील कमाल तापमान वाढलेले असले, तरी हवेची झुळूक सुरू असल्याने हवेचा स्तर सुधारल्याचे दिसते.
.............................
परिसर हवा गुणवत्ता निर्देशांक स्तर
मुंबई - ४९ - उत्तम
वरळी - ३९ - उत्तम
बीकेसी - ३२ - उत्तम
अंधेरी - ४२ - उत्तम
मालाड - ५१ - समाधानकारक
माझगाव - ७१ - समाधानकारक
बोरिवली - ५४ - समाधानकारक
चेंबूर - ७६ - समाधानकारक
....................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT