मुंबई

मुंबईत २२६ इमारती अतिधोकादायक

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : मुंबई महापालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या एकूण २२६ इमारतींची यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगरे विभागात ६५, तर पश्चिम उपनगरे विभागात १२६ इमारतींचा समावेश आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

पालिका क्षेत्रातील २२६ इमारतींना ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित करण्यात आले आहे. या इमारतींची विभागनिहाय यादी पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिक यात आपल्या इमारतीची यादी तपासू शकतात. इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी पालिकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित केल्यानंतर आणि निवासस्थाने रिक्त करण्याच्या सूचना केल्यानंतरही काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. अशा इमारतींतील नागरिकांनी तत्काळ ताबा सोडून इमारती स्वतःहून निष्कासित करण्यास सांगितले आहे.

उपकर प्राप्त इमारती व इतर धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत संबंधित सक्षम प्राधिकरण यांनी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही दिले आहेत. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नागरिकांची राहील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

अशी घ्या काळजी
- आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६/ २२६९-४७२५/२२६९-४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
- धोकादायक इमारत तातडीने रिकामी करावी.
- आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांनाही सतर्क राहण्यास अवगत करावे.
- तातडीने तज्ज्ञ आरसीसी तांत्रिक सल्लागार यांना दाखवून प्रॉप्स/टेकू लावण्याची कार्यवाही करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT