मुंबई

अंगणवाड्या

CD

४१४ अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी
सरकारचा चार संस्थांशी करार

मुंबई, ता. १ : राज्यातील ४१४ अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी चार सामाजिक संस्थांशी सरकारने करार केल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायतींमधील ५५,७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान शासन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बुधवारी (ता. ३१) अंगणवाड्या दत्तक देण्याबाबतचे करार झाले. या वेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, विपला फाऊंडेशन, ग्रामसेवा प्रतिष्ठान, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट, कार्बेट फाऊंडेशन इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्याच्या ‘अंगणवाडी दत्तक’ धोरणाअंतर्गत कॉर्पोरेट संस्था, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था आणि ट्रस्टच्या बरोबरीने व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करता येणार आहे. या धोरणानुसार १५६ सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ४,८६१ अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. बुधवारी विपला फाऊंडेशनने पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ३६८ अंगणवाड्या, ग्रामसेवा प्रतिष्ठानने रायगड आणि ठाण्यामधील ३० अंगणवाड्या, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई उपनगर आणि नाशिकमधील १० अंगणवाड्या आणि कार्बेट फाऊंडेशनने सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यामधील १६ अंगणवाड्या क्षमता वृद्धीसाठी दत्तक घेतल्याचेही लोढा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT