मुंबई

१ लाख ७३ हजार ५८६ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण

CD

मुंबई, ता. २ : दहावीच्या परीक्षेत राज्यातील एकूण १ लाख ७३ हजार ५८६ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहेत. सवलतीच्या गुणांचा लाभ घेणारे सर्वाधिक विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. येथील ४२ हजार ६४९ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहे; तर मुंबईतील २९ हजार ३६६ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण आहेत.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक
राज्य शिक्षण मंडळाने निकालानंतर नकारात्मक विचाराने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी २५ जूनपर्यंत ऑनलाईन समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विविध समस्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी ७३८७४००९७०, ८३०८७५५२४१, ९८३४९५१७५२, ८४२११५०५२८, ९४०४६८२७१६, ९३७३५४६२९९, ९३२१३१५९२८, ७३८७६४७९०२, ८७६७७५३०६९ आदी समुपदेशकांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जूनचा कालावधी
निकालानंतर गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जून, छायाप्रतीसाठी ३ ते २२ जून या कालावधीत अर्ज करता येईल. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले; तर पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार आहे.

१०० टक्के गुण मिळणारे विद्यार्थी
लातूर - १०८
संभाजीनगर - २२
अमरावती - ७
मुंबई - ६
पुणे - ५
कोकण -३
नाशिक, नागपूर, कोल्हापूर - ०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT