मुंबई

अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी

CD

मुंबई, ता.१७ : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र, वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी कॅरीऑनची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नियामक परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

मंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सन २०२३ मधील प्रात्यक्षिक परीक्षा ७ ते १४ मेदरम्यान तसेच लेखी परीक्षा १७ मे ते ०६ जुनदरम्यान घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल २९ जून रोजी जाहीर करण्यात आला होता.
यात अनेक विद्यार्थी प्रथम व द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण झाले. त्यांना या वर्षापुरता कॅरीऑनचा लाभ देण्याचा विचार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील साधारणत: २२ हजार विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्याकरीता आणि ३६ हजार विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र कर्म पूर्ण करण्याकरीता संधी उपलब्ध होणार आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT