मुंबई

मुंबईत वैद्यकीय आणीबाणी जाहीर करा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईतील प्रदूषण चिंताजनक स्थितीजवळ येऊन पोहोचले आहे. लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असून मुंबईत वैद्यकीय आणीबाणी जाहीर करा, अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केली आहे.

रवी राजा यांनी वाढत्या प्रदूषणासाठी पालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की मुंबई जगातील सातव्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. यातून पालिका प्रशासकाची कामगिरी कशी आहे ते दिसत आहे. प्रशासनाने एकप्रकारे मुंबईला आपत्कालीन स्थितीत जाण्यास भाग पाडले आहे, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

लोकांना कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. लोकांनी मास्क घालावेत आणि घरी एअर प्युरिफायर चालवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना दोनतीन आठवड्यांहून अधिक काळ खोकला येत आहे. असे असतानाही पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. ऑक्टोबरच्या मध्यापासून आम्ही याबाबत संवेदनशील आहोत. पालिकेला वारंवार कारवाई करण्यास सांगत आहोत. प्रशासन प्रदूषणापेक्षा फेरमूल्यांकनाच्या नावाखाली निविदांचे दर वाढवण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पालिका एअर प्युरिफायर बसवण्याबद्दल बोलले, पण त्याचे पुढे काहीही झाले नाही. पालिका हे वैद्यकीय आणीबाणी म्हणून का घोषित करू शकत नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT