Marathi Language Day
Marathi Language Day sakal
मुंबई

Marathi language Day : मराठी भाषा दिनाचा अमेरिकेतील शिकागोत गौरव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मराठी भाषा दिना निमित मराठी भाषा आणि तिचा गौरव अमेरिकेतील शिकागो येथे करण्यात आला. महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या ‘साहित्य कट्टा’च्या आयोजकांनी मराठी भाषा गौरव दिन एका आगळ्या आणि वेगळ्या प्रकारे साजरा केला. 

जगातील दहाव्या क्रमांकाची आणि भारतातील तिसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी मराठी भाषा किती समृद्ध होत चालली आहे हे त्यांच्या काव्यातून दिसून येत होते. अमृताहून गोड आणि वैभवशाली अशा मराठी भाषेचा गौरव दिन आज कवी संमेलनामुळे मोठ्या उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या ‘साहित्य कट्टा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवींना निमंत्रण देऊन कवी संमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमात सुंदर सूत्रसंचालनाचा आणि सर्व कवींनी सादर केलेल्या कवितांचा श्रोत्यांनी  मनमुराद आनंद घेतला. 

यात  महाराष्ट्रातील  प्रतिभावान कवी- कवयित्री मीनाक्षी पाटील, मनोज पाठक, विशाखा विश्वनाथ, वृषाली विनायक आणि गितेश शिंदे यांनी आपल्या निवडक कविता वाचून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. मीनाक्षी पाटील यांनी आपल्या विशेष शैलीत चपखल आणि सुंदर निवेदन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सर्व श्रोत्यांनी अतिशय आत्मीयतेने 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला.

शिकागो परिसरातील मराठी श्रोते आवर्जून मोठ्या संख्येने कवी संमेलनात आले होते. प्रेक्षक कवितांना उत्स्फूर्तपणे दाद देत होते. मुक्तछंदातल्या सहजसुंदर शब्दांमध्ये रचलेल्या कविता ऐकून मंडळातील नवसाहित्यिकांना यातून चांगलीच स्फूर्ती मिळाली. विशाखा, वृषाली, आणि गितेश सारखे नवकवी नवीन रूपकांनी कवितांना नटविताना दिसून येत होते.  नवीन कल्पनांचा शृंगार मराठी काव्यावर चढवत होते.

मनोज पाठक यांच्या कविता छोट्या छोट्या असल्या तरी त्यातला मतितार्थ फार गहन आणी मोठा होता. विशाखा विश्वनाथ यांनी त्यांच्या 'वामांगी' कविते मधून रूख्मिणीच्या मनातील भावना अतिशय सुंदरपणे व्यक्त केल्या. बाहुल्यांची देवी - ही कल्पनाच फार वेगळी आणि छान. frozen tears भविष्याची जाणीव करून देणारे होते, खरंच आज ज्या प्रमाणे आधुनिकीकरण होतंय, त्यानुसार भविष्यात खरंच आपण frozen tears वापरायला लागू कदाचित.

गितेश शिंदे यांच्या 'हरवलेले पोस्टर' 'अकाली नवरा गेला तर' या दोन्ही कविता मन हेलावून टाकणार-या. 'CCTV च्या गर्द छायेत' कविता खूपच आवडली. सामाजिक जाणिवांचे सूचक शब्दात केलेले रेखाटन विचार करायला लावण्यासारखे आहे.

वृषाली विनायक यांच्या स्त्री जाणीवा आणि त्यांची बदलत्या काळातील स्पंदने ह्याचा अभ्यास त्यांच्या कवितांमधून जाणवून गेला. 'बेदरकार वागणे झेपत नाही पुस्तकाला' 'कविता स्वतःसाठी असावी , मनाच्या कोपर-यात बंदिस्त ठेवावी' हे अगदीच पटले.

मीनाक्षी पाटील यांच्या कवितेतून स्त्री आणि पुरूषांच्या 'स्व' विषयक जाणिवांमधला फरक दर्शवताना त्यांनी मानवी मनोव्यापाराचे सुंदर दर्शन घडवले. त्यांची 'प्रवास ' ही कविता सहज संवादी शैलीत आपल्या सगळ्या प्रवासांची आठवण करून देणारी अशी होती .

या कार्यक्रमाचे संचालन माधव गोगावले आणि त्यांचे सहकारी साहित्य कट्ट्याचे संयोजक अश्विनी कुंटे, श्रद्धा भट, मंजुषा पांडे आणि समीर बोंगाळे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातील महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी हे कवी संमेलन भरवण्यासाठी खूपच मोलाची मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT