मुंबई

शासकीय गटात साखरा जिल्हा परिषद शाळा प्रथम

CD

मुंबई, ता. ३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील राज्यस्तरीय पारितोषिकांसाठी निवडलेल्या शाळांची यादी आज जाहीर झाली आहे. राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेने पटकावला आहे. रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील हेदवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील घालेवाडी जिल्हा परिषद शाळेने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती दिली.
पारितोषिक प्राप्त शाळांना ५ मार्चला आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी, तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम नियमित राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या अभियानात ६६ कोटींच्या वर बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस ५१ लाख, द्वितीय क्रमांक २१ लाख आणि तृतीय क्रमांकास ११ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. अभियानात राज्यस्तरावर १, मुंबई महापालिका १, अ व ब वर्ग महापालिका १, विभागस्तरीय ८, जिल्हास्तरीय ३६, तालुकास्तरीय ३५८ अशी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका, ‘अ’ व ‘ब’ वर्ग महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख आणि तिसरे पारितोषिक सात लाखांचे असेल. आठ विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख, तिसरे सात लाख रुपयांचे, जिल्हास्तरावर पहिले ११ लाख, दुसरे पाच लाख, तिसरे तीन लाख रुपये, तर तालुकास्तरावर पहिले तीन लाख, दुसरे दोन लाख, तिसरे एक लाख रुपये अशी ६६ कोटी १० लाखांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी सांगितले.
----
अभियानातील सहभाग
एकूण शाळा : १,०३,३१२
शासकीय : ६४,३१२
खासगी : ३९ हजार
विद्यार्थी : १,०४,६४,४२०
विद्यार्थिनी : ९४,९७,१६६
--------
खासगी गटात ‘एस्पेलियर हेरिटेज स्कूल’ प्रथम
खासगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव धागा) शाळेने पटकावले. शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर (ता. बारामती, जि. पुणे) आणि भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या शाळांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
---------------------
‘वाचन सवय प्रतिज्ञेची ‘गिनीज बुक’कडून दखल
वाचन चळवळीमध्ये १८ लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञेत सहभाग घेतला. शिक्षणविषयक हस्तलिखित स्पर्धेत १३ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एका दिवसात हस्ताक्षरातील अभिप्रायांचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड केले आहे. याची दखल ‘गिनीज बुक’ने घेतली असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान पेपरलेस पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात आल्याचे सांगून केसरकर म्हणाले, वीजबचत, आर्थिक साक्षरता, डिजिटल उपकरणांचा वापर, लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसन याकडे अभियानात विशेष लक्ष देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tatkal Ticket New Rules : 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; रेल्वे स्थानकांवर लागू होणार नवी टोकन प्रणाली

Who is Saransh Jain? भारताच्या कसोटी संघात एन्ट्री घेणारा सारांश जैन कोण? त्याची निवड श्रीलंका दौऱ्यासाठी का इतकी महत्त्वाची?

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

बापरे! ज्युनियर एनटीआर जखमी, खांद्याला झाली गंभीर दुखापत

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

SCROLL FOR NEXT