मुंबई

राज्यात मलेरियाने मृत्यूवर अंकुश

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईसह राज्यात मलेरियामुळे २०२२ मध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०२३ मध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत यंदा जानेवारी ते एप्रिलपर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने राज्य सरकारकडून होणाऱ्या जनजागृतीमुळे मृत्यूचा आलेख घसरला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांनी २००७ मध्ये २६ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मलेरियाचा धोका, प्रतिबंध आणि उपचारांबाबत या माध्यमातून जनजागृती करणे हा यामागचा उद्देश होता. या जनजागृतीचा परिणाम सध्या राज्यात दिसू लागला आहे. पाच वर्षांपूर्वी मलेरियामुळे सरासरी ५० रुग्ण मृत्युमुखी पडत होते. मात्र, त्यात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. २०२३ मध्ये राज्यात दररोज सरासरी ४४ प्रकरणे आढळून आली होती. यंदा, आता रोजची सरासरी संख्या २२ रुग्णांवर आली आहे.
--------------------------
मलेरिया निर्मूलनाचे प्रयत्न
मलेरिया हा आजार ॲनोफिलीस डासाच्या चाव्याद्वारे पसरतो. या डासांना प्रतिबंध करण्यासाठी पहिल्यांदा जागतिक मलेरिया दिन २००८ मध्ये साजरा करण्यात आला. या अनुषंगाने आरोग्य विभागाने कीटकनाशकांची फवारणी करणे, डासांची उत्पत्ती ठिकाणे नष्ट करणे आणि जनजागृती केली आहे. परिणामी, देशातील २१ राज्ये मलेरियामुक्त घोषित केली जाऊ शकतात; तर उर्वरित राज्ये २०२५ ते २०२७ दरम्यान मलेरियामुक्त होतील.
-------------------------------
वर्ष रुग्ण मृत्यू
२०२१ १९३०३ १४
२०२२ १५४५१ २६
२०२३ १६१५९ १९
२०२४ २६५० ०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT