मुंबई

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सामाजिक संघटना सरसावल्या

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : भारतीय संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी मतदारांनी सजग आणि निर्भय मतदान करावे, यासाठी मुंबईत ‘निर्भय बनो’ जाहीर सभा घेण्यात आली. ही सभा दुभाषी मैदान, गुजरात सोसायटी रोड, विलेपार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सामाजिक संघटना सरसावल्याचे दिसून आले.
सभेमध्ये सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर आणि सीताराम शेलार यांनी मार्गदर्शन केले. सध्या लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. निवडणुकीचे चार टप्पे पार पाडले असून पाचवा टप्पा येऊ घातला आहे. मुंबईतील मतदानही पाचव्या टप्प्यात २० मे रोजी होत आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर ती घसरत असल्याचे दिसते. लोकशाहीसाठी ही चिंतेची बाब आहे. पाचव्या टप्प्यात अशी परिस्थिती राहू नये. जास्तीतजास्त लोकांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे, असे ‘भारत जोडो’ अभियानाचे प्रमुख डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले.
...
राष्ट्रीय कर्तव्य बजावणे गरजेचे
मुंबईतील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, याकरिता संविधानिक मूल्यांना अनुसरून मतदान करावे. आणि आपल्या लोकशाहीच्या उत्सवात आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, ही आज आपल्या देशाची गरज आहे, असे आवाहन करण्यासाठी आम्ही ‘भारत जोडो अभियान आणि निर्भय बनो’ जाहीर सभेत करत असल्याचे निर्भय बनो अभियानाचे सहसमन्वयक सीताराम शेलार यांनी सांगितले.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझी ओळख, माझे नाव, माझा चेहरा... गौतम गंभीरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; २.५० कोटींचा नुकसानीचा दावा, नेमकं काय प्रकरण?

Krishna River Pollution: कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात! सातारा, सांगली पट्ट्यात पाण्याची गुणवत्ता खालावली; ‘प्रदूषण’चा शासनास अहवाल..

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत गुढीपाडव्याचा जल्लोष; विकासकामांच्या चित्ररथाने वेधलं लक्ष

HDFC Bank Chairman: कोण आहेत अतनू चक्रवर्ती? गुजरातचे माजी IAS ते HDFC बँकेचे चेअरमन आणि आता अचानक राजीनामा

Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT