मुंबई

हिंदू अध्यासन केंद्रात मंदिर व्यवस्थापनाचे धडे

CD

मुंबई, ता. १५ : हिंदू अध्यासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या प्राचीन वेद, पुराण आदी विषयांवरील अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरू असतानाच आता या अध्यासनातून मंदिर व्यवस्थापनाचे धडे शिकणारा पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. जूनपासून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमात तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यापीठातील हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात सहा महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी मुंबई विद्यापीठाचे हिंदू अध्यासन केंद्र आणि टेम्पल कनेक्ट या संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांत मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी, या व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठात नव्याने वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू होत आहेत. यातून विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख होईल, त्याचबरोबर एका नवीन रोजगाराच्या संधीचे दालन खुले होणार आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच या अभ्यासक्रमाच्या प्रतिसादावर याची व्याप्ती वाढवून ‘एमबीए इन टेम्पल मॅनेजमेंट’ असाही अभ्यासक्रम राबवण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, मंदिर व्यवस्थापन प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष तथा श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे माजी अध्यक्ष व ‘टेम्पल मॅनेजमेंट’ ग्रंथाचे लेखक डॉ. सुरेश हावरे, टेम्पल कनेक्टचे संस्थापक आदी उपस्थित होते.
----
अभ्यासक्रमात हे सहा विषय
मंदिर व्यवस्थापन या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानपरंपरा, व्यवस्थापन शास्त्राची महत्त्वाची सूत्रे व तत्त्वे, स्थापत्य, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वित्त व्यवहार, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरण व परिसरपूरक अशा विषयांचा अभ्यासक्रमांत समावेश केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update : भरधाव कारने ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT