मुंबई

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचा पतीला दणका

CD

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचा पतीला दणका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पत्नीशी काडीमोड घेतल्यानंतर तिला पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पतीला वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला आहे. कर्जाचे हप्ते फेडणे, आई-वडिलांचा सांभाळ करणे अशी कारणे सांगून पती विभक्त पत्नीला पोटगी देण्याची जबाबदारी झटकू शकत नाही, असे स्पष्ट करत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने पत्नीला पोटगी मंजूर केली.

लग्नाच्या काही दिवसांनंतर छोट्या-छोट्या कारणांवरून विवाहितेला सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरुवात केली. माहेरहून ३ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा तिच्याकडे लावला. पैसे आणले नाही म्हणून तिला टोमणे मारले; तसेच तिचा शारीरिक छळ केला. सासरच्या या जाचाला कंटाळून माहेरी राहणाऱ्या विवाहितेने अखेर पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. तसेच विवाहितेने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण व पोटगीची मागणी केली; मात्र पतीने तिचा दावा फेटाळून लावला. आई-वडिलांचा सांभाळ करतो; तसेच कर्जाचे हप्ते फेडतो. त्यामुळे पोटगी देऊ शकत नाही, असा दावा पतीने दंडाधिकारी न्यायालयात केला. दंडाधिकारी न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत पतीचा दावा फेटाळून लावत अर्जदार पत्नीला दरमहा ४ हजार रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश पतीला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT