मुंबई, ता. २७ ः देशभरात सरकारी स्तरावर उभ्या राहणाऱ्या महापुरुषांसह अन्य पुतळ्यांची तपासणी करून राज्य कला संचालनालयाची अंतिम मान्यता घ्यावी लागते. मात्र, मालवण येथील धातूच्या पुतळ्याला संचालनालयाची अंतिम मान्यताच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत राज्य कला संचालनालयाचे संचालक प्रा. राजीव मिश्रा यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो होऊ शकला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकार आपटे यांना कामकाज सोपवण्यात आले होते. त्यांनी राज्य कला संचालनालयाकडे सुरुवातीला सहा फूट आकाराच्या मातीत तयार केलेल्या क्ले मॉडेलच्या मूर्तीतील कलात्मकता तपासून त्याची मान्यता घेतली होती. यासाठी दोन अधिकाऱ्यांनी जाऊन तपासणीही केली होती. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा धातूचा मुख्य पुतळा तयार झाल्यानंतर अंतिम तपासणीची कला संचालनालयाची मान्यता घेतली नसल्याची माहिती समोर येत आहे. संचालनालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून शिल्पकाराचे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ आदींचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे; पण असे तरी राज्य कला संचालनालयानेदेखील स्वतःहून या विषयाकडे लक्ष दिले नसल्याबाबत सवाल आता उपस्थित केला जात आहे.
-------------------------------
या सरकारच्या काळात गैरकारभाराची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनाही यांनी सोडले नाही. पुतळा प्रकरणातून त्यांचाही अपमान करून सत्ताधारी भाजपने राज्यातील जनतेचा अपमान केला आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी.
- ॲड. अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस
-----------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.