मुंबई

एनएसडीएलचे बीकेसीत कॉर्पोरेट कार्यालय

CD

एनएसडीएलचे बीकेसीत कॉर्पोरेट कार्यालय
मुंबई, ता. २७ : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) या भारतातील पहिल्या डिपॉझिटरीने आज बीकेसी येथील आपल्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन केले.
सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सेबीचे पूर्णवेळ सदस्य अश्वनी भाटिया, कमलेश वार्ष्णेय, आय.डी.बी.आय बँकेचे एमडी आणि सीईओ राकेश शर्मा, एन.एस.ई.चे एमडी आणि सीईओ आशीष चौहान आदी मान्यवर या वेळी हजर होते. याप्रसंगी एनएसडीएलने आपल्या तीन नवीन उपक्रमांद्वारे कॉर्पोरेट बाँड्सच्या सुरक्षा आणि देखरेखीसाठी ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आणि पर्यायी गुंतवणूक निधी खात्यांसाठी ए-क्यूब एकीकरण सादर केले. या वेळी माधबी पुरी बुच यांनी प्रथम श्रेणी नियामक म्हणून डिपॉझिटरीच्या भूमिकेवर भर दिला. एनएसडीएल बोर्डाचे अध्यक्ष प्रवीणकुमार गुप्ता यांनी भारतीय भांडवली बाजाराच्या प्रगतीची माहिती दिली. संस्थेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल एनएसडीएलच्या एमडी आणि सीईओ पद्मजा चंदुरू यांनी सेबीच्या अध्यक्षांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT