दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या
अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ
१५ ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज
मुंबई, ता. ३० : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. विस्तारित वेळापत्रकानुसार आता १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत या सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एम. ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ॲडव्हान्स अकाऊंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट) एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावरून भरता येतील. त्याचबरोबर एमसीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसही १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एमसीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे प्रवेशासाठी लिंक पाठविण्यात आली आहे, तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट (सत्र १ आणि २) च्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसही मुदतवाढ देण्यात आली आहे.
पदव्युत्तर प्रथम आणि द्वितीय वर्षासाठीचे एम. ए. (शिक्षणशास्त्र)चे प्रवेश आणि द्वितीय वर्ष एम. ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (अकाऊंट/ मॅनेजमेंट), एम. एस्सी. (गणित) एम. एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम. एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज - https://idoloa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावरून भरता येतील.
पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बीए. बीकॉम, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज - https://idoloa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावरून भरता येतील. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय असून यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सीडीओईचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे. सीडीओईचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. नजीकच्या काळात पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.