मुंबई

मुंबईतील अतिदुर्गम भागासाठी '' मोबाईल व्हॅन दवाखाने ''

CD

मुंबईतील अतिदुर्गम भागासाठी ‘मोबाईल व्हॅन’ दवाखाने
आरेमधील आदिवासींना घराजवळ आरोग्य सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईतील अतिदुर्गम भागासाठी ‘मोबाईल व्हॅन’ दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. यामुळे माहुल आणि आरेमधील रहिवाशांना सुविधा मिळणार आहे. पालिकेने नागरिकांना आपल्या घरानजीक वैद्यकीय तपासणी, उपचार व आरोग्य सल्ला देणारी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेच्या माध्यमातून ही सेवा सुरू केली आहे.


मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते, चेंबूरमधील जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल येथे या फिरत्या तपासणी केंद्रांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा मुंबईकरांना आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांनाही आरोग्य सेवा पुरवते. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून मुंबईतील कानाकोपऱ्यात महापालिकेची आरोग्य सेवा विस्तारली आहे. त्यासोबतच, महापालिका क्षेत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, गोराई, माहुल गाव यांसारख्या तुलनेने दुर्गम भागांतील पाडे आणि वस्तीपर्यंत नियमित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. गरजू नागरिकांना आरोग्याच्या सेवा सहज उपलब्ध होताना विशेषतः विनामूल्य वैद्यकीय तपासणी, उपचार व सल्ला उपलब्ध व्हावेत, यादृष्टीने आपला दवाखाना योजनेतून विस्तार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली होती.
या दोन फिरत्या केंद्रांपैकी एक मोबाईल वाहन पी दक्षिण विभागातील आरे वसाहत विभागासाठी सेवा देईल, तर दुसऱ्या वाहनाच्या माध्यमातून एम पूर्व विभागात माहुल, अण्णा भाऊ साठे नगर, लोटस वसाहत, रफी नगर, चीता कॅम्प भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल. या फिरत्या आरोग्य तपासणी केंद्राची सेवा देण्याची वेळ ही सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे.

मे. अमेरिकेयर्स इंडिया फाउंडेशन यांच्यामार्फत कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी तत्त्वानुसार दोन्ही फिरते आरोग्य तपासणी केंद्र (मोबाईल वाहन) उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रात महापालिकेमार्फत एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मासिस्ट आणि एक बहुद्देशीय कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत नागरिकांना मोफत तपासणी, मोफत सल्ला, मोफत औषधोपचार याचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT