अपहृत बालिकेची
जयपूरमधून सुटका
मुंबई, ता. ३ : चर्चगेट परिसरातून १० सप्टेंबरला अपहृत झालेल्या एक वर्षाच्या बालिकेची गुन्हे शाखेने गुरुवारी जयपूर येथून सुखरूप सुटका केली. बालिकेचे अपहरण करणाऱ्या प्रीती ऊर्फ पायल लक्ष्मणसिंग या २३ वर्षांच्या विवाहितेस अटक करण्यात आली. मूल होत नसल्याने हे कृत्य केल्याचे तिने सांगितले असून गुन्हे शाखेकडून तिचा पती आणि सासरच्या मंडळींचा शोध सुरू आहे.
आरोपी पायल मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. तिचे लग्न झाले असून सासर जयपूरमध्ये आहे. बालिकेचे अपहरण केल्यावर वांद्रे येथून ती मध्य प्रदेश येथे व तेथून जयपूर येथे दडून बसली होती. जयपूरमधील एका एटीएम केंद्रात तिने आसरा घेतला होता. या प्रकरणाचा तपास मरीन ड्राइव्ह पोलिसांसोबत गुन्हे शाखेकडूनही सुरू होता. पोलिस निरीक्षक रोहिणी पोतदार आणि पथकाने सीसीटीव्ही चित्रण, मध्य प्रदेश व जयपूर पोलिस आणि खबऱ्यांमर्फत पायलचा छडा लावला. अपहृत मुलगी मिळेल की नाही, या विवंचनेत असलेल्या तिच्या पालकांनी गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.