व्यावसायिकाला अडीच कोटींचा गंडा
मुंबई : व्यावसायिकाला अडीच कोटींचा गंडा घालणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात बुधवारी रात्री सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
निहार लुंड असे व्यावसायिकाचे नाव आहे. २०२२ मध्ये मनीष त्रेहान या व्यक्तीने निहार यांच्याकडून दोन कोटी रुपये वर्षभरासाठी व्याजाने घेतले होते. जाहिरात एडिटिंगचा व्यवसाय असून त्याची व्याप्ती वाढविण्याचा हेतू मनीषने निहार यांना सांगितला होता. मुदत संपताच निहार यांनी पैशांची मागणी केली. तेव्हा मनीषने सतवंतसिंग मग्गू याने एका व्यक्तीसह निहार यांची भेट घेतली. त्या वेळी मग्गू याने स्वतःची ओळख एका चित्रपट कंपनीमध्ये अधिकारी असल्याची करून दिली. त्यानंतर दोन कोटी रुपये एका चित्रपटाच्या निर्मितीत गुंतवल्याचे सांगितले. तसेच, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास चांगला नफा मिळवून देऊ, असे सांगत निहार यांच्याकडून आणखी ५० लाख रुपये घेतले; मात्र ही रक्कम त्यांनी परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निहार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.