सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईतील रस्ते आणि फुटपाथचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ३८ झाडांच्या मुळांवर हे काँक्रीटीकरण झाले आहे. यातील ११ झाडे मरणासन्न अवस्थेत असून इतर झाडांचीही तशीच अवस्था झाली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेची गंभीर दखल घेत मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गोवंडीच्या देवनार- शिवाजीनगर येथे झाडांच्या मुळावर काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या झाडांच्या खोडापर्यंत पाणी पोहोचणे अशक्य झाल्याने अनेक झाडे सुकली आहेत. त्यांचा बळी जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात न आल्याने इरफान खान यांनी ॲड. अल्ताफ खान यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन पालिकेला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आणि सुनावणी १३ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.