मुंबई

सायन, राजावाडीचा पुनर्विकास

CD

सायन, राजावाडीचा पुनर्विकास
उपचार मिळणे अधिक सोपे; रेडिओथेरपी, केमोथेरपी युनिटने सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिकेने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्बांधणीला मंजुरी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पुनर्बांधणी योजनेवर सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुनर्बांधणीनंतर या रुग्णालयांमध्ये उपलब्ध सुविधांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.
सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयात २०२० मध्ये महापालिकेने डॉक्टर आणि नर्सेससाठी इमारत बांधण्यास मंजुरी दिली होती. हे काम आता पूर्णत्वाकडे आले असून त्यापूर्वी सायन रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील आराखडा मंजूर केला आहे. येथे जुन्या किचन आणि वॉर्ड इमारतीच्या जागी १३ आणि १४ मजल्यांच्या चार निवासी इमारती आणि त्यांना जोडणारा फूट ब्रिजसह रुग्णालयाच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत.
पूर्व उपनगरात महापालिकेचे मोठे रुग्णालय असलेल्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात रुग्णांचा ताण वाढत आहे. इतर जागा उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेने रुग्णालयाच्या जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती बांधून वॉर्डांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजावाडी रुग्णालयाची इमारत सध्या तळमजल्यासह चार मजली आहे. एकूण ५९६ खाटा आहेत. त्याच्या जागी तळमजल्यासह १० मजली इमारत बांधली जाणार असून त्यावर सुमारे ६६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुनर्बांधणीनंतर येथील खाटांची संख्या १०२० पर्यंत वाढेल. राजावाडीत खाटांची संख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे उपनगरीय रुग्णांना फायदा होणार आहे.
सायन रुग्णालय पुनर्रचना प्रकल्पांतर्गत येथे दोन हजार २३५ खाटांची १४ मजली मुख्य इमारत, ५७२ खाटांची १३ मजली इमारत, २१३ खाटांची १४ मजली इमारत आणि १३ मजली ओपीडी इमारत बांधण्यात येणार आहे. सायन रुग्णालयाच्या इमारतीला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात येणार आहे, जेणेकरून एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत सहज ये-जा करता येईल. या कामांवर विविध करांसह दोन हजार ४६२ कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी सायन आणि राजावाडी रुग्णालयांसह एकूण तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सायन रुग्णालयात सध्या एकूण एक हजार ९०० खाटा आहेत. नवीन इमारती बांधल्यानंतर येथील खाटांची संख्या पाच हजारच्या पुढे जाईल.

-दोन मजली भूमिगत बी १ आणि बी २ बांधण्यात येणार आहे.
-रेडिओथेरपी युनिट, केमोथेरपी युनिट, आयसीयू सुविधा

सायन रुग्णालयाच्या विस्तारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. काही वेळात येथे काम सुरू होईल. आगामी काळात सायन रुग्णालय कर्करुग्णांनाही चांगल्या उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
डॉ. मोहन जोशी,
लोकमान्य टिळक, रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT