राज्यातील जलजन्य आजारात वाढ
२०२४ मध्ये सर्वाधिक आढळले अतिसाराचे रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : राज्यात पावसाचा हंगाम संपला असला, तरी राज्यात जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील वर्षी राज्यात जलजन्य आजाराची १९ वेळा साथ आली होती, मात्र यंदा १ जानेवारी ते ७ नोव्हेंबरदरम्यान ७१ वेळा साथींची नोंद करण्यात आली. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या तिप्पट वाढली आहे.
यंदा राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढल्याने दूषित पाणी, दूषित अन्न किंवा पेय, संक्रमित प्राणी अथवा व्यक्तीच्या संपर्कात आल्याने विविध जलजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळच्या रुग्णांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात २०२३ मध्ये जलजन्य आजाराच्या एक हजार २१३ रुग्णांची नोंद झाली होती. याच तुलनेत गेल्या २०२४ मधील १० महिन्यांच्या काळात तीन हजार ५६४ रुग्ण नोंदवले गेले. त्यात अतिसाराचे सर्वाधिक १२५७ रुग्ण आढळले. काविळचे ६२० रुग्ण, कॉलराचे १०२८ रुग्ण, गॅस्ट्रोचे ६५९ रुग्ण नोंदवले गेले. अतिसाराने सहा, काॅलरा आणि गॅस्ट्रोचे प्रत्येकी चार, तर काविळने एका रुग्णाचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.