८५ वर्षांवरील दोन हजार ज्येष्ठांचे गृहमतदान
मुंबई, ता. १७ : मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षांवरील १,९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग अशा एकूण २,१५४ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
राज्यात २० नोव्हेंबरला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रत्येकाचे मत मोलाचे असून कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेतर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्यात १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृह टपाली मतदान घेण्यात आले. या मतदानासाठी टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेअंतर्गत ८५ वर्षांवरील व दिव्यांग मतदारांनी मतदान केले.
...
मतदानाची आकडेवारी
मतदारसंघ - ज्येष्ठ - दिव्यांग
धारावी - २० - ९
सायन कोळीवाडा - २७ - २४
वडाळा - २३४ - २२
माहीम - ५७० - २३
वरळी - ११३ - १९
शिवडी - २०९ - ३२
भायखळा - १६७ - ३९
मलबार हिल - २६९ - १०
मुंबादेवी - १०३ - ११
कुलाबा - २४४ - ९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.