मुंबई

घरबसल्या मिळवा वाहनासाठी पसंतीचा क्रमांक

CD

घरबसल्या मिळवा वाहनासाठी पसंतीचा क्रमांक
परिवहनची ऑनलाइन सेवा आजपासून ग्राहकांच्या सेवेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः तुम्हाला तुमच्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक हवा असेल, तर आरटीओ कार्यालयात जाण्याची, अर्ज करण्याची कटकट आता संपली आहे. परिवहन विभागाने पसंतीच्या क्रमांकासाठी सॉफ्टवेअर विकसित केले असून ही सेवा राज्यभरातील आरटीओ कार्यालयांशी संलग्न करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना आता सोमवारपासून (ता. २५) घरबसल्या ऑनलाइन अर्ज व शुल्क भरून पसंतीचा क्रमांक मिळविता येणार आहे.
आपल्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक मिळावा, यासाठी अनेकजण वाटेल ती किंमत मोजतात. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पायऱ्या झिजवतात. अशावेळी पसंतीचा क्रमांक मिळवून देण्याच्या बहाण्याने दलालांची साखळी वाहनमालकांची लूटही करते, परंतु परिवहन विभागाने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. पिंपरी-चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात नुकतीच त्याची यशस्वी चाचणी पार पडली. त्यानंतर आता राज्यभरात ही सेवा कार्यन्वित करण्यात येत आहे. या माध्यमातून वाहनधारकांनी त्यांच्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक मिळावा, म्हणून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
----------
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
पसंतीच्या क्रमांकासाठी परिवहन विभागाच्या https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर नाव, आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नावनोंदणी करावी. त्यानंतर अर्ज आणि शुल्काचा भरणा करून पसंतीचा क्रमांक आरक्षित करता येऊ शकेल.
===
अन्य सुविधाही ऑनलाइन उपलब्ध
राज्यातील वाहनधारकांच्या सुविधेसाठी आरटीओतील लर्निंग लायसन्स, लायसन्सवरील पत्ता बदलणे, जन्मतारीख बदलणे, हरवल्यास दुय्यम प्रत काढणे, वाहन हस्तांतरित करणे, आरसी बुकची दुय्यम प्रत काढणे, यासह ५० हून अधिक सेवा वाहनचालकांना ऑनलाइन उपलब्ध आहेत.
----
ऑफलाइन लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच
सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने सुरू राहील. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक/पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील, त्यामध्ये पसंतीच्या/आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा अर्ज करणाऱ्या अर्जदारास कार्यालयातील रोखपालाद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती ऑफलाइन पद्धतीने जारी करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई-पुण्यात किती रुपये? तुमच्या शहराचा भाव पाहा

Gokul Dudh Sangh Dispute : 'गोकुळ' सुनावणीवरून दुग्ध विभागात गोंधळ; नोटिसीशिवाय सुनावणी म्हणजे अधिकाऱ्यांची हुकूमशाही, दूध उत्पादकांचा संताप

Marathi News Live Updates : गुरमीत राम रहीमला पुन्हा 21 दिवसांची फर्लो मंजूर; आतापर्यंत 17 वेळा आला तुरुंगाबाहेर

Mhasurli Clinic Inspection: खासगी दवाखान्यांत अनोळखींकडून पाहणी म्हासुर्लीत खळबळ ः महिला, पुरुषांचा समावेश; चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद

Sugar Prices Fall: साखर दरात घसरण; पण ग्राहक नाही; किरकोळ बाजारात मात्र महागच

SCROLL FOR NEXT