मुंबई

पावसाळापूर्व कामांची योग्य अंमलबजावणी करा

CD

पावसाळापूर्व कामांची
योग्य अंमलबजावणी करा
पालिका आयुक्तांचे रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांना आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः मुंबईतील रेल्‍वेलगतच्‍या नाल्यातून गाळ काढण्याची कामे योग्यरितीने आणि पूर्ण क्षमतेने करावीत, रेल्‍वे रुळांवर पाणी तुंबून उपनगरी रेल्वेसेवा ठप्प होणार नाही, याची काळजी घ्या, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्‍या अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी दौरे करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
पालिका पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभाग आणि पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासन यांची पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक महापालिका मुख्‍यालयात आज (ता. १८) पार पडली. त्‍या वेळी महापालिका आयुक्त गगराणी यांनी निर्देश दिले. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) श्रीधर चौधरी यांच्‍यासह रेल्‍वे विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत जोरदार पावसाप्रसंगी सखल परिसरांमध्ये रेल्‍वे रुळांवर पाणी साचल्‍याच्‍या घटनांमुळे रेल्‍वेसेवा बाधित होते. त्‍यामुळे प्रवाशांना असुविधेला सामोरे जावे लागते. रेल्‍वे स्‍थानक, रेल्‍वेच्‍या हद्दीत पावसाचे पाणी साचल्‍याच्या घटना कमी व्‍हाव्‍यात, यासाठी पालिका सतत प्रयत्‍नशील आहे. या पार्श्‍वभूमीवर, मागील काही वर्षांत ज्‍या ठिकाणी रेल्‍वे रुळांवर पाणी साचण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत, अशा ठिकाणांचा स्‍थळनिहाय आढावा घेऊन कोणती कार्यवाही केली, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते.
मध्‍य रेल्‍वे विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा कार्यशाळा, चुनाभट्टी, वडाळा रेल्‍वे स्‍थानक, मुख्याध्यापक कल्व्हर्ट, मिठी नदी (शीव-कुर्ला), ब्राह्मणवाडी नाला आणि टिळक नगर नाला, विद्याविहार रेल्‍वे स्‍थानक (फातिमा नगर), कर्वे नगर नाला (कांजूरमार्ग), हरियाली नाला आणि संतोषी माता नाला, मारवाडी नाला आणि मशीद नाला, भांडुप रेल्‍वे स्‍थानक (क्रॉम्प्टन नाला, दातार नाला, उषानगर, भांडुप प्‍लॅटफॉर्म क्रमांक १ तसेच, पश्चिम रेल्‍वे विभागातील अंधेरी, बोरिवली या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी करण्‍यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची या वेळी विस्‍तृतपणे चर्चा करण्‍यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune HeatWave: पुणेकरांना उष्म्याच्या झळा! महापालिका रुग्णालयांत ७७० जणांवर उपचार, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या अंशांपलीकडे..

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

SCROLL FOR NEXT