मुंबई

अग्निशमन दलाचे ड्रोन कागदावरच

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अग्निशमन दल अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा समावेश करण्याची गरज आहे; मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ड्रोनचे आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे असून, मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागत आहे.
उंचीवरील आग विझवण्यास सक्षम फायर ड्रोन ताफ्यात घेण्याचा विचार मुंबई अग्निशमन दल करीत आहे. दोन वर्षांपूर्वी ड्रोनचे पहिले प्रात्यक्षिक भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात घेण्यात आले. त्यानंतर १०० किलो वजन घेऊन ५० मीटर म्हणजे साधारणतः १८ मजल्यापर्यंत उडू शकतात, अशा प्रकारचे ड्रोन अग्निशमन दलात समाविष्ट करण्यात आले. अग्निशमन अधिकाऱ्यांनी शहराच्या आवश्यकतेनुसार काही बदल ड्रोनमध्ये सुचवले होते. त्यानंतर इतर कंपन्यांच्या ड्रोनची प्रात्यक्षिके महिनाभरापूर्वी घेण्यात आली. मुंबई अग्निशमन दलातील तांत्रिक तज्ज्ञांनी पालघर येथे ड्रोनची प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर काही बदल सुचवण्यात आले; मात्र त्यासाठीचा खर्च कोटींच्या घरात गेल्याने प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
---------------------------------------
अत्याधुनिक फायर रोबोटचा समावेश
मुंबईतील अनेक इमारती १०० वर्षांहून जुन्या आहेत. अनेक ठिकाणी ज्वलनशील पदार्थ, गॅस इत्यादींचा धोका आहे. अशा ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवाला धोका असतो. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने अत्याधुनिक फायर रोबोट्सचा समावेश केला आहे. वर्षभरात आणखी पाच रोबोट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT