मुंबई, ता. १८ : पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मिर्झा हिमायत बेगला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. एकांतवासामुळे कोणताही मानसिक परिणाम होत नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने मिर्झा बेग याची मागणी फेटाळली.
पुण्यातील कोरेगाव पार्कच्या जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी स्फोट झाला होऊन, या दुर्घटनेत पाच परदेशी नागरिकांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाचा तपास करणाऱ्या एटीएसला (दहशतवादविरोधी पथक) उदगीर येथे राहणाऱ्या बेगच्या घरातून १.२ किलो आरडीएक्स सापडले होते. स्फोटासाठी हे आरडीएक्स वापरण्यात आले होते. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये मिर्झा बेग याला दोषी ठरवले. गेल्या वर्षी बेगने उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत नाशिक मध्यवर्ती कारागृहात एकांतवासात ठेवल्याचा दावा केला आहे. त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याने एकांतवासातून बाहेर हलवण्यात यावे, अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार देत बेग याची मागणी फेटाळून लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.