आरोग्यमित्रांचा बेमुदत संप
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी जोडल्या गेलेल्या रुग्णालयांत गरीब रुग्णांना मदत करणाऱ्या आरोग्यमित्रांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. तसेच राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलनेही करण्यात येत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिल्याने रुग्णांचे हाल होणार आहेत.
सरकारकडून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. याशिवाय आयुष्मान भारत कार्डद्वारे रुग्णांना काही नियुक्त रुग्णालयांमध्ये मोफत उपचारही मिळतात. रुग्णालयांत या योजनांचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी आरोग्यमित्र हे रुग्ण आणि रुग्णालयांमध्ये दुवा म्हणून कार्य करतात. आरोग्यमित्रांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. एक वर्षापासून ते पगारवाढीची मागणी करीत असून, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. किमान वेतन कायद्यानुसारही पगार मिळत नसल्याचा आरोप आरोग्यमित्रांनी केला आहे. याबाबत सरकारला वारंवार इशारा दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यामुळे बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
प्रमुख मागण्या
- दरमहा २६ हजार रुपये मानधन द्यावे
- किमान वेतन कायद्यांतर्गत विशेष भत्ता आणि महागाई भत्ता लागू करावा. दरवर्षी १० टक्के वेतनवाढ द्यावी
- रजेचा लाभ देण्यात यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.