मुंबई

महामुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा

CD

महामुंबईसह कोकणला उष्णतेच्या लाटेचा इशारा
खबरदारीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : भारतीय हवामान खात्याने मुंबईसह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी २६ फेब्रुवारीला उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतरही तापमान चढेच राहण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे तसेच दुपारी घरून निघताना पाणी सोबत ठेवण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच अतिशय कडक ऊन जाणवत आहे. पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार असून, त्यामुळे राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आला आहे. कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील तापमान सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले आहे. मुंबई आयएमडीच्या वरिष्ठ अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले, की तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांच्या वर पोहोचल्यावर इशारा दिला जातो. या काळात दुपारी बाहेर पडणे टाळावे, असे त्यांनी सांगितले. बाहेर जाणे आवश्यक असल्यास पाणी सोबत ठेवा. फेब्रुवारी महिन्यात पारा सामान्यपेक्षा जास्त नोंदवला गेल्याची एका दशकातील ही चौथी वेळ आहे. राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला असून, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात दिवसाच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत कोकणातील बहुतांश भागात तीव्र उष्मा वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत कोरडे हवामान अनुभवायला मिळेल. हवामान विभागाने या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.
...
सांगलीत उष्माघाताने मृत्यू
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी मुंबईतील सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३८.४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील मुंबई आणि कोकणात सध्या अत्यंत उष्ण आणि दमट हवामानाची नोंद होत असून, नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. कडक उन्हामुळे सांगलीत सोमवारी उष्माघाताने एकाचा मृत्यूही झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT