मुंबई

उन्हाळ्यात २२०० मेगावॉटची वाढीव वीज मागणीचा अंदाज

CD

उन्हाळ्यात २,२०० मेगावॉटची
वाढीव वीज मागणीचा अंदाज

एआय तंत्रज्ञानासह अदाणी इलेक्ट्रिसिटी सज्ज

मुंबई, ता. २६ : उन्हाळी हंगामातील अंदाजे २,२०० मेगावॉट वाढीव विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा अद्ययावत करून अदाणी इलेक्ट्रिसिटी सज्ज झाली आहे. दिवसभरात वेगवेगळ्या कालावधीत विजेच्या मागणीचा अचूक अंदाज बांधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे.

मागील उन्हाळ्यात हीच मागणी २,०८९ मेगावॉट होती. यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने १,३०० मेगावॉट वीज खरेदीसाठी दीर्घकालीन करार केले आहेत. सौर व पवन ऊर्जा आणि अन्य प्रकारांतून निर्माण झालेल्या विजेचा समावेश आहे. तसेच ५०० मेगावॉट वीजखरेदीसाठी मध्यम कालावधीचे करार केली जातील आणि सौरऊर्जा आणि पवनऊर्जा याद्वारे तयार झालेल्या आणखी ७०० मेगावॉट विजेची खरेदी केली जाणार आहे. आणखी विजेची गरज भासल्यास ती खरेदी केली जाणार आहे.

दिवसभरात वेगवेगळ्या कालावधीत विजेची मागणी किती राहील, याचा अचूक अंदाज बांधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि यंत्रसामुग्रीवर आधारित मागणी अंदाज पद्धतीचा वापर केला जात आहे. या पद्धतीत यापूर्वीच्या मागणीचा प्रकार, हवामानाचा अंदाज आणि सध्याची ग्रीडची अवस्था यांचा आवश्यक वीजखरेदीसाठी आणि तुटवडा टाळण्यासाठी अभ्यास केला जात आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीने आधुनिक ऑपरेशन सेंटर आणि यांत्रिक सबस्टेशन उभारली असून, त्याद्वारे आपल्या ऊर्जा जाळ्यावर सतत लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. या तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम असे भार व्यवस्थापन, त्वरेने दोष शोध आणि निवारण, कार्यक्षम वीज वितरण, जास्तीत जास्त ग्रीडचे स्थैर्य आणि वीजपुरवठा खंडित होणे टाळणे शक्य होणार आहे.
-------
ग्राहकांच्या तक्रारींचा झटपट निपटारा
अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे त्यांच्या कॉल सेंटरच्या कामातही कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग पद्धतीचा वापर करून आणीबाणीच्या काळात कोठून किती तक्रारी येऊ शकतील त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कर्मचारी नियुक्त केले जातात. त्याखेरीज ग्राहकांच्या प्रश्नांना व तक्रारींना प्रतिसाद देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रांचा वापर करून किमान वेळात आणि अचूकतेने ग्राहकांना उत्तरे दिली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT