मुंबई

लग्नाच्या भुलथापा देऊन फसवणूक

CD

लग्नाच्या भुलथापा
देऊन फसवणूक
डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : एका रुग्णालयात लॅब टेक्निशियन असलेल्या २९ वर्षीय तरुणीला लग्नाच्या भुलथापा देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या डॉक्टरविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

२०२१ मध्ये रुग्णालयात या तरुणीची २८ वर्षीय डॉक्टरशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर दोन महिन्यांतच आरोपीने लग्न करण्यास नकार देत तिच्याशी संबंध तोडले. तरुणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी डॉक्टरला शासकीय सोडतीत वांगणी येथे घर लागले होते. भविष्याची तरतूद म्हणून त्या घराची रक्कम दोघांनी मिळून भरायची असे ठरले. त्यानुसार तक्रारदार तरुणीने आरोपीच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पावणे दोन लाख रुपये भरले. तसेच त्याला ७० हजार रुपये मूल्य असलेला आयफोन घेऊन दिला होता. त्यामुळे केवळ आर्थिक फायद्यासाठी त्याने लग्नाच्या दिल्याचा भुलथापा दिल्याचा आरोपही तरुणीने तक्रारीत केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT