मुंबई

सेन्सेक्स २१७ अंश घसरला

CD

सेन्सेक्स २१७ अंश घसरला

मुंबई, ता. १० : अमेरिकेतील अस्थिर आर्थिक परिस्थितीमुळे सोमवारी (ता. १०) जगातील सर्व शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. त्यानुसार भारतातही सेन्सेक्स २१७.४१ अंश, तर निफ्टी ९२.२० अंश घसरला.

अमेरिकी शेअर बाजारांचे फ्युचर्स सोमवारी दिवसभर घसरण दाखवित होते; त्यातच तेथील बेरोजगाराची संख्याही वाढल्यामुळे आशीयाई शेअर बाजार तोटा दाखवीत उघडले; त्यामुळे सुरुवातीला भारतीय शेअर बाजार संथपणे उघडले. तासाभरातच सेन्सेक्सनी ७४,७४१ पर्यंत मजल मारली; मात्र सर्वत्र निराशेचे वातावरण असल्यामुळे तेथून हळूहळू विक्रीचा मारा सुरू झाला आणि त्या उच्चांकी स्तरापासून सेन्सेक्स सुमारे ७०० अंश खाली घसरला. दिवसअखेर सेन्सेक्स ७४,११५.१७ अंश, तर निफ्टी २२,४६०.३० अंशांवर स्थिरावला.

एफएमसीजी हे क्षेत्र सोमवारी काही अंशी नफा दाखवीत होते. बाकी सर्व क्षेत्रे तोट्यात होती. सरकार जीएसटी घटवणार असल्याच्या चर्चांमुळे ग्राहकउपयोगी वस्तूंच्या शेअरवर सर्वांचे लक्ष गेले; तुकडा तांदुळाच्या निर्यातीला सरकार संमती देणार असल्याचा फायदा तांदूळ निर्यात कंपन्यांना होईल, अशी चर्चा होती, उन्हाळा येत असल्याने वातानुकूल यंत्रांची मागणी वाढत असून, कॉम्प्रेसरचा तुटवडाही दूर होईल, या अपेक्षेत त्याचा फायदा त्या कंपन्यांना होईल, असे वातावरण होते. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे दीड आणि दोन टक्का घसरले, तर १२० शेअर बीएसईवर वर्षभराच्या नीचांकी स्तरावर गेले.
आज इंडसइंड बँक चार टक्के, तर झोमॅटो अडीच टक्के घसरला. लार्सन अँड टुब्रो, टायटन या शेअरचे भाव दोन टक्के घसरले. महिंद्र आणि महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, बजाज फायनान्स या शेअरचे भाव एक टक्का घसरले. दुसरीकडे पॉवरग्रेड तीन टक्के व हिंदुस्तान युनिलिव्हर दोन टक्के वाढला. नेसले, एशियन पेंट अर्धा टक्का वाढले.

..
घरगुती सकारात्मक बातम्या नसल्यामुळे सध्या शेअर बाजार ठरावीक टप्प्यात फिरत राहील, कच्चे तेल, डॉलर, अमेरिकी करवाढ या मुद्द्यांवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT