मुंबई

होळी, रंगपंचमीला मद्यपींची नाकाबंदी

CD

होळी, रंगपंचमीला
मद्यपींची नाकाबंदी

गर्दीच्या ठिकाणांवर कडेकोट बंदोबस्त

मुंबई, ता. १२ : होळी, रंगपंचमीनिमित्त रस्त्यावरील मद्यपींचा अतिरेक रोखण्यासाठी मुंबई पोलिस शहरात सर्वत्र नाकाबंदी लावून ड्रंक ॲन्ड ड्राइव्हविरोधात विशेष मोहीम हाती घेणार आहेत. याशिवाय गल्लीबोळात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दीची ठिकाणे, दाट आणि मिश्र वस्त्यांवर विशेष लक्ष असेल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

होळी, रंगपंचमी आणि दारू हे समीकरण बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर अपघात होऊ नयेत, रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या पादचारी, वाहनांना त्रास होऊ नये, महिलाविरोधी गुन्हे घडू नयेत, धर्म किंवा समाजभावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन केल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
---
असा असेल बंदोबस्त
मुंबई पोलिस दलातील सात अतिरिक्त आयुक्त, १९ उपायुक्त, ५१ सहाय्यक आयुक्तांसह १,७६७ पोलिस अधिकारी आणि ९,१४५ पोलिस अंमलदार शहरात तैनात करण्यात येणार आहेत. बाजारपेठा, रेल्वे स्थानके, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील भागांत विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पोलिसांसह राज्य राखीव पोलिस बल, दंगल नियंत्रण पथके, शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक व नाशक पथक, गृहरक्षक दलाचा चोख बंदोबस्त ठेवला जाईल, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले.
----
नाकाबंदी, कोम्बिंग आजपासून
गुरुवारी, शुक्रवारी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून तळीराम चालक, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. नियमभंग करणाऱ्या आस्थापना व अभिलेखावरील गुन्हेगारांची झाडाझडतीही घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: गॅस सिलिंडर वेटिंग कमी झाली, तरी नागरिकांची अडचण कायम आहे; युद्धानंतर गॅस पुरवठा विस्कळीत; वेटिंग अजूनही हजारोंमध्ये

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाच्या चटक्याने हवा प्रदूषणातही वाढ ; शहराचा एक्यूआय १४० च्या घरात; संवेदनशील गटांसाठी धोक्याची घंटा

Kairi Poha Recipe: काय? तुम्ही अजून 'कैरी पोहे' ट्राय नाही केले? जाणून घ्या अस्सल कोकणी चवीची सोपी रेसिपी

Chhatrapati Sambhajinagar: खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर नको; पाण्याच्या मीटरचा ५१४ कोटींचा नव्याने प्रस्ताव

Trimbakeshwar VIP Darshan Scam: त्र्यंबकेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त कडलगला अटक

SCROLL FOR NEXT