घाऊक चलनवाढीत किंचित वाढ
मुंबई, ता. १७ : फेब्रुवारी महिन्यातील घाऊक चलनवाढ जानेवारीच्या तुलनेत किंचित वाढली असून, ती आता २.३८ टक्के झाली आहे. केंद्रीय व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जानेवारीत ही चलनवाढ २.३१ टक्के होती. अन्न निर्देशांकात अन्नपदार्थ तसेच तयार खाद्यपदार्थ यांचा समावेश असून, जानेवारीत त्यांची चलनवाढ ७.४७ टक्के होती, तर फेब्रुवारीत ती ५.९४ टक्के झाली. तयार खाद्यपदार्थांच्या, अन्नपदार्थांच्या तसेच बिगर अन्नपदार्थ आणि तयार कपडे यांच्या किमती वाढल्याने फेब्रुवारीत घाऊक चलनवाढ किंचित वाढल्याचे सांगितले जाते. डिसेंबरमध्ये ही चलनवाढ २.५७ टक्के होती.
सरकार प्रत्येक महिन्याच्या मध्याला घाऊक किमतीच्या आधारे चलनवाढ घोषित करते. देशभरातील काही संस्थांकडून तसेच ठरावीक उत्पादकांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे हा निर्देशांक जाहीर केला जातो. सध्या वर्षभर चलनवाढ दर शून्याच्या वर टक्केवारी दाखवत आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये घाऊक चलनवाढ शून्याच्या खाली उणे टक्केवारी दाखवित होती. तर जुलै २०२०मध्ये म्हणजेच कोविड कालावधीतही घाऊक चलनवाढ उणे टक्केवारी दाखवित होती. सप्टेंबर २०२२ पर्यंत सलग १८ महिने ही चलनवाढ दुहेरी आकड्यात होती. गेले काही महिने देशाला उच्च अन्न चलनवाढीचा सामना करावा लागत असून, भाज्या, फळे, तेल आणि स्निग्ध पदार्थ यांची दरवाढ झाल्यामुळे चलनवाढ झाली होती; मात्र आता ती हळूहळू कमी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.