‘एसर इंडिया’तर्फे महिलांना मासिक पाळीची एक रजा
मुंबई, ता. २५ : महिला सक्षमीकरण आणि महिला हित जोपासण्यासाठी ‘एसर इंडिया’ने मातृका या धोरणानुसार महिलांना मासिक पाळीसाठी दरमहा एक अतिरिक्त पगारी रजा देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे महिला आपल्या मासिक पाळीच्या आरोग्याला प्राधान्य देत नियमित रजेच्या हक्कावर परिणाम न करता या रजेचा लाभ घेऊ शकतील. ‘एसर इंडिया’चे हे पाऊल, लिंग समानता, आरोग्य आणि कर्मचारी हित या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, असे ‘एसर इंडिया’चे अध्यक्ष आणि एमडी हरीश कोहली यांनी सांगितले. महिलांना रोज सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळेल, असे कार्यस्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.